vishwagandhaayurved

श्री विश्वगंध आयुर्वेद पंचकर्म सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटल, संगमनेर हे केवळ एक उपचार केंद्र नाही, तर नैसर्गिक उपचारातून आरोग्य, सौंदर्य आणि आत्मिक शांततेचा अनुभव देणारे एक सुसंस्कृत आरोग्यधाम आहे. डॉ. अतुल देशमुख आणि डॉ. स्मिता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या हॉस्पिटलमध्ये पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञान आणि आधुनिक आरोग्यसेवा यांचा सुंदर समतोल साधला गेला आहे. येथील प्रत्येक उपचारकक्ष आयुर्वेदातील निकषानुसार तयार केले गेले असून, तुम्हाला येथे शुद्धता, शांती आणि सकारात्मक ऊर्जा यांचे प्रसन्न वातावरण अनुभवता येते.
‘श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटल: तुमच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम सेवा!’ या संकल्पनेवर आधारित सेवा येथे पुरवली जाते. पंचकर्म व उपकर्मासाठी विशेष उपचार योजना, स्त्री आरोग्यविषयक सल्ला व उपचार, नैसर्गिक औषधांचा प्रभावी वापर, आणि विविध आयुर्वेदिक थेरपीज यांच्या माध्यमातून इथे संपूर्ण शरीर-मन-संवेदनेचे शुद्धिकरण केले जाते. याचबरोबर, त्वचा व केसांसाठी नैसर्गिक उपचार, आणि वजन नियंत्रणासाठी सुसंगत उपाय देखील उपलब्ध आहेत.

शात्रशुद्ध, स्वनिर्मित औषधे हे आमचे वैशिष्ट्य आहे. यासोबतच, कॅशलेस उपचार सुविधा, व प्रेमळ सेवा देणारे प्रशिक्षित कर्मचारी ही आमची खास ओळख आहे.
डॉ. स्मिता देशमुख यांचा त्वचारोग व सौंदर्य विषयातील अनुभव आणि डॉ. अतुल देशमुख यांचे पंचकर्म व जीवनशैली सुधारण्यातले मार्गदर्शन यांचा लाभ घेऊन ‘श्री विश्वगंध’ हे नाव आज एक विश्वासार्ह, नैसर्गिक आणि परिणामकारक आयुर्वेदिक सेवांचे प्रतीक बनले आहे. इथे उपचार हे केवळ औषधांनी नव्हे; तर प्रेम, संयम आणि निसर्गाच्या स्पर्शानेही केली जातात. हेच आमचं खास वैशिष्ट्य आहे.

आयुर्वेदातला आमचा अनुभव

समाधानकारक अनुभव
0 +

उपचार घेणाऱ्यांचा विश्वास हा आमचा खरा यशाचा मापदंड आहे.

वर्षांची परंपरा
0 +

आयुर्वेद क्षेत्रातील दीर्घ अनुभवातून आम्ही गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करतो.

पुरस्कारांचे सन्मान
0 +

आमच्या कामगिरीचा सन्मान राष्ट्रीय स्तरावर झाला आहे.

संस्थापक, डॉ. अतुल देशमुख यांचा संदेश

श्री विश्वगंध हॉस्पिटलमध्ये आपले मन:पूर्वक स्वागत आहे.

चांगले आरोग्य म्हणजे फक्त आजार बरा करणे नव्हे, तर ते एक संपूर्ण जीवन जगण्याचा दृष्टिकोन आहे. ‘श्री विश्वगंध आयुर्वेदिक हॉस्पिटल’ ही संकल्पना याच विचारातून जन्माला आली जिथे उपचार, संवेदना आणि आधुनिकतेचा समतोल साधला जातो.
आजच्या धावपळीच्या युगात, संपूर्ण आणि सुसंगत आरोग्य सेवा मिळणे ही मोठी गरज बनली आहे. आमचे ध्येय म्हणजे विविध वैद्यकीय पद्धती जसे की आयुर्वेद, फिजिओथेरपी, योग, निसर्गोपचार आणि इतर उपचारपद्धती या सर्वांना एकत्र आणून, आजाराशी पिडीताच्या संपूर्ण उपचार प्रक्रिया अधिकाअधिक परिणामकारक करते.
आज आम्ही केवळ उपचार देत नाही; तर संशोधन, जनजागृती आणि आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी देखील कार्यरत करत आहोत. आमचे उद्दिष्ट फक्त आजचे आरोग्य सुधारण्याचे नाही; तर आरोग्यदायी आणि जागरूक समाज घडवण्याचे आहे.

आपल्या सर्वांच्या उज्ज्वल, निरोगी, आणि समाधानी आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!

डॉ. स्मिता देशमुख यांचा संदेश

नमस्कार! मी डॉ. स्मिता. मी स्त्रीरोग तज्ञ आहे. स्त्रियांच्या आरोग्यासाठी सक्रियपणे काम करत असून, पाळीशी संबंधित समस्या जसे ओटीपोट, पाठ, कंबर, छाती आणि पाय दुखणे, चिडचिड होणे, PCOD, आणि अंगावरून सफेद जाणे यांसारख्या तक्रारींवर मी उपचार आणि आहारीय मार्गदर्शन देते.
स्त्री व पुरुष वंध्यत्व, स्त्री बीज तयार होण्यात येणाऱ्या अडचणी, तसेच बीजाच्या वाढीच्या समस्यांवर मी विशेष उपचार करते. वंध्यत्वासाठी माझी उत्तरबस्ती उपचार पद्धती अनेकांसाठी लाभदायक ठरली आहे. गर्भपिशवीचे विकार, जसे की सूज येणे, Tubal ब्लॉक होणे, किंवा गर्भपिशवीला होणाऱ्या जखमांवर देखील मी उपाययोजना देते. याशिवाय, Menopause संबंधित तक्रारींसाठी आयुर्वेदाच्या पंचकर्म आणि शिरोधारा उपचार पद्धतींचा उपयोग करून महिलांना शारीरिक आणि मानसिक ताणतणावांपासून आराम मिळवून देण्यात यशस्वी ठरले आहे.
१८ वर्षांच्या अनुभवाच्या आधारावर, मी प्रत्येक तक्रारीला व्यक्तिगत दृष्टिकोनातून हाताळत आहे. प्रत्येक रुग्णाच्या समस्या समजून घेऊन, त्वरित आणि प्रभावी उपचारांद्वारे त्यांच्या आरोग्याचा समतोल सुधारण्याचा प्रयत्न करते. माझा उद्देश फक्त उपचार करण्याचा नसून, महिलांना त्यांच्या आरोग्यात आनंद आणि समाधान मिळवून देण्यासाठी सक्रिय राहण्याचा आहे. पुढेही, सर्वोत्तम सेवा देऊन आरोग्यपूर्ण जीवनाकडे वाटचाल करण्यास सहकार्य करण्याचा माझा सक्रिय प्रयत्न राहील.

आम्हालाच का निवडाल?

आरोग्याच्या मार्गावर, मनःशांती हेच आमचे ध्येय!

श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये आमचा दृष्टिकोन केवळ आजार बरा करण्यात मर्यादित नाही, तर प्रत्येक व्यक्तीच्या संपूर्ण आरोग्याचा, मानसिक संतुलनाचा आणि जीवनशैलीच्या समतोलाचा विचार करून सखोल मार्गदर्शन करण्यावर आमचा भर असतो.

आमचे ध्येय

आमचे ध्येय केवळ आजार बरे करण्यापुरते मर्यादित नाही तर आजार होऊच नयेत यासाठी प्रयत्न करणे, जे आजारी आहेत त्यांचे आरोग्य नैसर्गिक आणि शाश्वत उपायांनी पुन्हा परत मिळवून देणे, आणि प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य आरोग्यदायी आणि आनंदी होण्यासाठी हातभार लावणे हेच आमचे खऱ्या अर्थाने ध्येय आहे.

आमचे उद्दिष्ट

आमचे उद्दिष्ट हे आयुर्वेदाच्या माध्यमातून आजारांशी पिडीतांना संपूर्ण आणि नैसर्गिक आरोग्य प्रदान करणे आहे. केवळ आजारांवर उपचार न करता, शरीर आणि मनाचा समतोल साधणे हाच आमचा खरा प्रयत्न आहे. विश्वास, गुणवत्तापूर्ण सेवा आणि प्रेमपूर्वक उपचारांद्वारे आम्ही प्रत्येक व्यक्तीचा आरोग्यप्रवास सहज, सकारात्मक आणि आरोग्यदायी बनवतो.

आयुर्वेदिक सल्लामसलत

आरोग्यासाठी योग्य मागर्दर्शन आणि उपचार हवे आहेत का?

श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये आपल्याला मिळते तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि पारंपरिक आयुर्वेद उपचार. आम्ही पंचकर्म, हर्बल उपचार, योग आणि ध्यानाच्या माध्यमातून आपल्याला शारीरिक आणि मानसिक शांती प्रदान करतो.

+91-7972999316

Scroll to Top