vishwagandhaayurved

श्री विश्वगंध आयुर्वेद पंचकर्म सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटल, संगमनेर हे केवळ एक उपचार केंद्र नाही, तर नैसर्गिक उपचारातून आरोग्य, सौंदर्य आणि आत्मिक शांततेचा अनुभव देणारे एक सुसंस्कृत आरोग्यधाम आहे. डॉ. अतुल देशमुख आणि डॉ. स्मिता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या हॉस्पिटलमध्ये पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञान आणि आधुनिक आरोग्यसेवा यांचा सुंदर समतोल साधला गेला आहे. येथील प्रत्येक उपचारकक्ष निसर्गाच्या सान्निध्यात तयार केले गेले असून, शुद्धता, शांती आणि सकारात्मक ऊर्जा यांचे प्रसन्न वातावरण येथे अनुभवता येते.

आरोग्य सेवा

मणक्यांचे विकार
पाठदुखी, स्लिप डिस्क, स्पॉन्डिलायटिस यांसारख्या त्रासांवर आयुर्वेदिक पंचकर्म व बस्ती प्रभावी उपचार.

सांधेदुखी / सांध्यांचे विकार
सांध्यांमध्ये सूज, वेदना, आणि हालचालींमध्ये अडथळा निर्माण करणारा विकार. आयुर्वेदाच्या उपचाराने हा विकार दीर्घकालीन काळासाठी बरा केला जातो.

यकृताचे विकार
कावीळ, लिव्हर सिरॉसिस, आणि फॅटी लिव्हर, असे यकृताशी संबंधित विकार. या समस्यांवर अनेक रुग्णांना उपयुक्त सिद्ध झालेले आयुर्वेदिक औषधी व मागर्दशन आम्ही देतो.

सोरायसिस – एक त्वचेचा आजार
डोक्यात कोंडा, त्वचेला खाज, आणि दीर्घकाळ राहणारा त्वचेचा रोग. आयुर्वेदामध्ये रक्तशुद्धी उपचार, आणि पंचकर्मातील शरीर शुद्धीकरण प्रक्रियेद्वारे सोरायसिस हा पूर्णपणे केला जातो.

मूळव्याध व गुदमार्गाचे विकार
गुदद्वाराभोवती आग,सूज, रक्तस्राव व वेदनांशी संबंधित विकार. आयुर्वेदामध्ये शुद्धीकरण, औषधी स्नान व आहार सुधारणा यांद्वारे उपचार केले जातात.

आम्लपित्त व पचनतंत्राचे त्रास
अपचन, जळजळ, आम्लपित्त, व अशक्तपणा यांसारखे त्रास आयुर्वेदाच्या आहारशुद्धी, औषधी व जीवनशैलीतील बदलांद्वारे नियंत्रित केले जातात.

आयुर्वेद - निरोगी जीवनाचा आधारस्तंभ!

आयुर्वेद का?

आयुर्वेद हे एक शाश्वत आणि शुद्ध उपचार पद्धती आहे, जी शरीर आणि मनाच्या एकात्मतेवर आधारित आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक लोकांना शारीरिक आणि मानसिक तणाव, विकार, आणि आजार यांचा सामना करावा लागतो.

हे प्राचीन ज्ञानावर आधारित असून तुमच्या शरीराच्या नैतिक संतुलनाला महत्त्व देते. यामुळे तुमचे आरोग्य फक्त आजारांपासून मुक्त होण्यावर न थांबता, तुमच्या जीवनाची गुणवत्ता देखील सुधारते. आयुर्वेदातील पंचकर्म, हर्बल उपचार, योग व ध्यान इ. साधनांचा वापर केल्यामुळे तुमच्या शरीराची व मनाची बाह्य व आंतरिक शुद्धीकरण होऊन तुम्ही अधिक ताजेतवाने जीवन अनुभवता.

आम्हालाच का निवडाल?

आरोग्याच्या मार्गावर, मनःशांती हेच आमचे ध्येय!

श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये आमचा दृष्टिकोन केवळ आजार बरा करण्यापर्यंत मर्यादित नाही; तर प्रत्येक व्यक्तीच्या संपूर्ण आरोग्याचा, त्यांच्या मानसिक संतुलनाचा तसेच जीवनशैलीच्या समतोलाचा विचार करून, त्यांना सखोल मार्गदर्शन करण्यावर आमचा भर असतो.

विश्वासाचा पाया: अनुभव

प्रत्यक्ष अनुभवावर आधारित आयुर्वेद उपचारांची विश्वासार्हताप्रत्यक्ष अनुभवावर आधारित आयुर्वेद उपचारांची विश्वासार्हता

आयुर्वेदिक सल्लामसलत

आरोग्यासाठी योग्य मागर्दर्शन आणि उपचार हवे आहेत का?

श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये आपल्याला मिळते तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि पारंपरिक आयुर्वेद उपचार. आम्ही पंचकर्म, हर्बल उपचार, योग आणि ध्यानाच्या माध्यमातून आपल्याला शारीरिक आणि मानसिक शांती प्रदान करतो.

+91-7972999316