वैद्यकीय सेवा

हृदयाचे आजार
हृदयाशी संबंधित त्रास जसे की छातीत दुखणे, छाती धडधडने, दम लागणे,पायावर सूज येणे, हृदयाच्या वॉलचे (झडपांचे ) आजार यांसाठी आयुर्वेदिक उपायांद्वारे नैसर्गिक उपचार केले जातात, जे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

रक्तवाहिन्यांचे आजार
शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहण्यासाठी रक्तवाहिन्यांशी संबंधित त्रासांवर जसे की रक्तवाहिन्या ब्लॉक होणे, Varicose veins, यांसाठी आयुर्वेदिक उपचार हे सुरक्षित आणि प्रभावी पर्याय आहेत. हे उपचार रक्तसंचार सुधारण्यात मदत करतात.

दमा
दमा म्हणजे श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणारा विकार. आयुर्वेदिक औषधे, व वनस्पतींच्या साहाय्याने दमा नियंत्रणात आणता येतो आणि श्वसनक्रिया सुधारता येते. पंचकर्मातील वमन, विरेचन क्रियेद्वारे दम्यास कारणीभूत घटक शरीराच्या बाहेर पाडून दमा पूर्णपणे बरा केला जातो. व त्याचा पुनरूद्भव टाळण्यासाठी रसायन चिकित्सा ही उपयुक्त ठरते.

सोरायसिस, त्वचाविकार
डोक्यात कोंडा, त्वचेला खाज येणे, कोरडेपणा, कोंडा पडणे, त्वचेला आग होणे, भेगा पडणे, लाल किंवा काळे चट्टे येणे, तळहात आणि तळपायाला भेगा पडणे, तसेच सांधेदुखी (Psoriatic Arthropathy) यांसारख्या समस्या सोरायसिसशी संबंधित असू शकतात. आयुर्वेदामध्ये योग्य पथ्याचे अन्न, रक्तशुद्धी उपचार, स्नेहन चिकित्सा, आणि पंचकर्माच्या शरीर शुद्धीकरण प्रक्रियेद्वारे सोरायसिस पूर्णपणे बरा करता येतो.

सफेद कोड
सफेद कोड हा त्वचेवरील वर्णद्रव्य कमी होऊन पांढऱ्या डागांच्या स्वरूपात दिसणारा त्वचाविकार आहे. आयुर्वेदामध्ये हे त्वचेतील दोष व रक्तदोषाशी संबंधित मानले जाते. योग्य आहार, औषधी, व पंचकर्म विशेष उपचार पद्धतींनी या स्थितीवर नियंत्रण मिळवता येते.

आम्लपित्त
आम्लपित्त म्हणजे पचनसंस्थेमध्ये अती आम्लता वाढल्यामुळे होणारा त्रास. त्यामुळे अन्ननलिकेत जळजळ, अपचन आणि अशक्तपणा जाणवतो. आयुर्वेदिक उपचारांद्वारे शरीरातील पित्त संतुलित करून आम्लपित्तावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते.

पोटाच्या तक्रारी
जुलाब ,अपचन, गॅस, भूक मंदावणे, पोट गच्च होणे, बद्धकोष्ठता यांसारख्या पोटाच्या तक्रारी दैनंदिन जीवनावर परिणाम करतात. आयुर्वेदिक उपचारांमुळे पचनतंत्र सुधारून, नैसर्गिक रीतीने आराम मिळवता येतो.

मूळव्याध
मूळव्याध ही गुप्त आणि वेदनादायक समस्या असून त्यात रक्तस्त्राव, वेदना व सूज होऊ शकते. आयुर्वेदिक औषधे आणि जीवनशैलीतील योग्य बदलांद्वारे यावर सुरक्षित आणि प्रभावी उपचार करता येतो.

संधिवात
संधिवात म्हणजे सांध्यांमध्ये सूज, वेदना आणि हालचालींमध्ये अडथळा निर्माण होणे. आयुर्वेदाच्या माध्यमातून शरीरातील दोषांचे संतुलन साधून संधिवातावर दीर्घकालीन आणि नैसर्गिक उपचाराने मात करू शकतो.

मुतखडा
मूत्रामधील खनिजांचे साचलेले थर म्हणजे मुतखडा. यामुळे तीव्र वेदना आणि मूत्राच्या तक्रारी होतात. आयुर्वेदामध्ये मूत्रमार्ग शुद्ध करणारे आणि खडे विसर्जित करणारे प्रभावी उपाय उपलब्ध आहेत.

फिटस
फिटस म्हणजे मेंदूच्या विजेच्या कार्यात होणारा बिघाड, ज्यामुळे अचानक झटका येतो. आयुर्वेदामध्ये वात दोष संतुलित करून मानसिक स्थैर्य आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवर उपाय दिले जातात. व फिट्स वर मत करता येते.

केस गळणे व पिकणे
केस गळणे व पिकणे ही आजच्या जीवनशैलीतील एक सामान्य समस्या आहे. आयुर्वेदात केसांची मुळे बळकट करणारे आणि केसांतील रंगद्रव्य पुनर्स्थापित करणारे व नैसर्गिक पोषण देणारे उपचार उपलब्ध आहेत, जे तुमचे केस निरोगी व मजबूत बनवतात.

यकृताचे विकार
कावीळ, लिव्हर सिरॉसिस, फॅटी लिव्हर, पोटात पाणी साठणे, अपचन, अशा यकृताशी संबंधित समस्यांवर अनेक रुग्णांना उपयुक्त सिद्ध झालेले आयुर्वेदिक औषधी, पचन सुधारणारे उपचार तसेच निरोगी जीवनशैलीसाठी योग्य मागर्दर्शन आम्ही देतो.

गर्भसंस्कार
गर्भसंस्कार म्हणजे गर्भावस्थेत मातेला आणि गर्भातील बाळाला दिले जाणारे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पोषण. आयुर्वेदाच्या मदतीने बाळाच्या बुद्धी, संस्कार आणि आरोग्याचा पाया घालण्यासाठी हे एक प्रभावी मार्ग आहे.